Summer Calf Care: वासरांमध्ये वाढतोय उन्हाचा ताण! ‘या’ उपायांनी ठेवा त्यांना सुरक्षित

Swarali Pawar

उन्हात वासरांची काळजी

उन्हाळ्यात वासरे इतर जनावरांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. थोडी काळजी घेतल्यास उष्माघात आणि मृत्यू टाळता येतो.

Livestock Welfare Summer | Agrowon

उष्णतेचे मुख्य धोके

जास्त तापमान, गर्दी आणि पाण्याची कमतरता धोकादायक ठरते. यामुळे वासरांमध्ये उष्माघाताचा धोका वाढतो.

Livestock Welfare Summer | Agrowon

पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

वासरांना दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ आणि थंड पाणी द्या. पाण्याचा हौद नेहमी सावलीत ठेवणे आवश्यक आहे.

Livestock Welfare Summer | Agrowon

दूध आणि आहाराची काळजी

लहान वासरांना पुरेसे दूध आणि पाणी मिळणे गरजेचे आहे. मोठ्या वासरांसाठी संतुलित चारा आणि कॉन्सन्ट्रेट द्या.

Livestock Welfare Summer | Agrowon

ऊर्जा आणि पूरक आहार

आहारात गुळ आणि मीठ १% प्रमाणात द्या. यामुळे सहनशक्ती वाढते आणि उष्णतेचा ताण कमी होतो.

Livestock Welfare Summer | Agrowon

गोठा थंड ठेवा

गोठ्यात हवा खेळती ठेवा आणि गर्दी टाळा. पंखे, फॉगर्स आणि शेडनेटचा वापर फायदेशीर ठरतो.

Livestock Welfare Summer | Agrowon

थंडावा देण्याचे उपाय

दुपारी ओले गोणपाट किंवा शेडनेट गोठ्यात लावा. गरज असल्यास वासरांच्या अंगावर पाणी टाका.Agrowon

Livestock Welfare Summer | Agrowon

नियमित आरोग्य काळजी

वेळेवर लसीकरण आणि जंतनाशक देणे आवश्यक आहे. नर आणि मादी दोन्ही वासरांची समान काळजी घ्या.

Livestock Welfare Summer | Agrowon

Tomato Diseases: टोमॅटो उत्पादन वाचवायचे आहे? विषाणूजन्य रोगांवर त्वरित उपाय करा

अधिक माहितीसाठी...