Anuradha Vipat
चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिण्याची पद्धत काही भागात पारंपारिक आहे.
चहात मीठ टाकून पिण्याने शरीरावर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम होऊ शकतात.
विज्ञानानुसार, मीठ जिभेवरील कडू चव ओळखणाऱ्या ग्रंथींना शांत करते. यामुळे चहाचा कडूपणा कमी होऊन त्याची चव अधिक सुधारते.
जड किंवा तेलकट अन्न खाल्ल्यानंतर चहात मीठ टाकून पिल्यास अन्न सहज पचते आणि गॅसची समस्या कमी होते.
उन्हाळ्यात किंवा जास्त घाम आल्यास शरीरातील सोडियम कमी होते. अशा वेळी चहातील मीठ शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरून काढण्यास मदत करते.
सर्दी-खोकला झाला असल्यास मीठ घातलेला चहा पिल्याने घशातील संसर्ग कमी होतो आणि बंद नाक उघडण्यास मदत होते.
चहामध्ये नियमित मीठ टाकून पिल्याने शरीरातील सोडियमची पातळी अचानक वाढू शकते.