Swarali Pawar
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते. म्हणून या काळात काही पदार्थ टाळणे आणि हलका आहार घेणे खूप गरजेचे असते.
भजी, वडे, समोसे यांसारखे जास्त तळलेले पदार्थ उन्हाळ्यात टाळावेत. हे पदार्थ पचायला जड असतात आणि शरीरात उष्णता वाढवतात.
पिझ्झा, बर्गर, चिप्स यांसारखे जंक फूड जास्त खाल्ल्यास पचनावर परिणाम होतो. यामुळे थकवा, अॅसिडिटी आणि पोटाचे त्रास वाढू शकतात.
उन्हाळ्यात जास्त मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे. असे पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात आणि पोटात जळजळ निर्माण करू शकतात.
चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते.
उन्हाळ्यात जास्त साखर असलेले कोल्ड ड्रिंक आणि थंड पेयांवर सगळे ताव मारतात. पण ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतही नाही.
उन्हाळ्यात जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता आणि आळस वाढतो. म्हणून गोड पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावेत.
उन्हाळ्यात हलका, ताजा आणि पचायला सोपा आहार घेणे चांगले. फळे, भाज्या आणि भरपूर पाणी घेतल्यास शरीर निरोगी राहते.