Swarali Pawar
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. म्हणून केळी बागेत योग्य पाणी नियोजन केल्यास झाडांची वाढ आणि उत्पादन चांगले राहते.
उन्हाळ्यात केळी बागेसाठी ठिबक सिंचन पद्धत वापरणे अधिक फायदेशीर ठरते. या पद्धतीने पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि पाण्याची बचतही होते.
उन्हाळ्यात साधारण ३ ते ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे पाणी द्यावे. हलक्या जमिनीत ओलावा कमी असल्याने २ ते ३ दिवसांनी पाणी देणे योग्य ठरते.
पाणी शक्यतो सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ५.३० नंतर द्यावे. या वेळेत उन्हाची तीव्रता कमी असल्यामुळे पाण्याचा जास्त फायदा होतो.
केळी बागेला पाणी देताना मातीमध्ये ६ ते ९ इंच खोलीपर्यंत ओलावा पोहोचला पाहिजे. यामुळे मुळे मजबूत राहतात आणि झाडांची वाढ चांगली होते.
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी झाडाभोवती सुकी पाने, पाचट किंवा भुसा टाकून मल्चिंग करावे. यामुळे मातीचे तापमान कमी राहते आणि तणांची वाढही कमी होते.
फेब्रुवारी-मार्च लागवड असल्यास झाडाला ४ ते ६.५ लिटर पाणी द्यावे. जून-जुलै लागवड असल्यास दररोज सुमारे १८ ते २० लिटर पाणी आवश्यक असते.
पाणी देताना तापमान, जमिनीचा प्रकार, पिकाचे वय आणि हवामान यांचा विचार करावा. योग्य नियोजन केल्यास पाण्याची बचत होते आणि केळीचे उत्पादन चांगले मिळते.