Vilayati Tamarind : विलायती चिंचेपासून कोणते पदार्थ तयार होतात?

Team Agrowon

विलायती चिंचेची लागवड प्रामुख्याने राजस्थानमधील अजमेर, उदयपूर आणि माउंट अबू जिल्ह्यात आहे.

Vilayati Tamarind | Agrowon

हे झाड सदाहरित असून, वीस मीटर उंचीपर्यंत वाढते. प्रत्येक शेंगेमध्ये सुमारे दहा बिया असतात. विलायती चिंचेमध्ये आवश्यक पोषक तत्त्वेदेखील असतात.

Vilayati Tamarind | Agrowon

ताजी फळे ः ताज्या फळांमध्ये थोडी साखर आणि मीठ मिसळून खाता येते.

Vilayati Tamarind | Agrowon

वाळलेली फळे : वाळलेल्या फळांची पावडर बनवतात. गोड आणि चवदार पदार्थांसाठी चव म्हणून वापरतात. पावडर पाण्यात भिजवून नंतर पेस्ट बनवतात.

Vilayati Tamarind | Agrowon

पेय : वाळलेल्या शेंगा रात्रभर पाण्यात भिजवून गोड चिंचेचे पेय बनवता येते. यामध्ये थोडी साखर मिसळावी लागते.

Vilayati Tamarind | Agrowon

चटणी : भिजवलेल्या चिंचेमध्ये गूळ मिसळून त्यामध्ये आले, हिरवी मिरची, मीठ मिसळावे.

Vilayati Tamarind | Agrowon

करी : पदार्थाला तिखट चव येण्यासाठी वेगवेगळ्या करीमध्ये चिंचेची पेस्ट वापरली जाऊ शकते.
मिठाई : चिंचेची पेस्ट आइस्क्रीम, जॅम इत्यादी विविध मिठाईमध्ये वापरली जाते.

Vilayati Tamarind | Agrowon