Onion Processing : वाळलेल्या कांद्यापासून कोणते पदार्थ तयार होतात?

Team Agrowon

कांद्यापासून विविध निर्जलीकृत अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ‘एफएसएसएआय' द्वारे निर्धारित केलेल्या विविध मानकांचा उपयोग केला जातो.

Onion Processing | Agrowon

निर्जलीकृत कांदा विविध प्रकारचे मसाले तयार करण्यासाठी मुख्य घटक म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे इन्स्टंट नूडल्स, बर्गर, पिझ्झा, सँडविच, विविध प्रकारच्या मसाला निर्मितीमध्ये वापर करतात.

Onion Processing | Agrowon

निर्जलीकृत कांद्याच्या विविध प्रकारच्या रूपांतरणामध्ये सामान्यतः कांद्याचे गोल काप, पावडर, कांद्याचा तुकडा, कांद्याच्या रिंग्स, संपूर्ण कांदा, कांदा क्यूब इत्यादी प्रकार तयार करतात. कन्व्हेटीव्ह ड्राईंग म्हणजेच गरम हवेच्या मदतीने कांदा सुकविला जातो.

Onion Processing | Agrowon

कांदा निर्जलीकरण करण्यासाठी फ्लुइडाइज्ड बेड ड्रॉइंग, सोलर ड्रॉइंग, इन्फ्रारेड ड्रॉइंग, व्हॅक्यूम मायक्रोवेव्ह ड्रॉइंग आणि ऑस्मोटिक ड्रॉइंग या पद्धतींचा वापर केला जातो.

Onion Processing | Agrowon

निर्जलीकृत कांदा बुरशी, खराब झालेला भाग, बाह्य कागदी साल, पाने आणि मुळांपासून मुक्त असावा. साल, खोडाचा भाग किंवा इतर बाह्य कचरा लागलेला असू नये.

Onion Processing | Agrowon

निर्जलीकृत कांद्यापासून पुनर्जलीत कांदा तयार करताना त्याला मूळ कांद्याची चव, सुगंध आणि झणझणीतपणा असावा. निर्जलीकृत कांद्याला खराब वास किंवा तेलकट वास नसावा.

Onion Processing | Agrowon

निर्जलीत कांदा तयार करताना बाहेरून कोणत्याही विषारी रंगांचा उपयोग केलेला नसावा.

Onion Processing | Agrowon