sandeep Shirguppe
केळी हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर फळ असून कोणत्याही डॉक्टर केळी खाण्याचा सल्ला देतात.
तुम्हाला पिवळ्या केळीबद्दल माहित आहे. परंतु, लाल केळी म्हणजेच काय, त्याचे फायदे कोणते याबाबत आपण जाणून घेऊ.
लाल केळीमध्ये दोन प्रकारचे कॅरोटीनोईड्स आहेत ज्यामुळे आपल्याला डोळ्याच्या समस्यापासून लांब राहतो.
आपण आहारात लाल केळीचा समावेश करा त्यामुळे तुमच्या शरिरातील बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळेल.
लाल केळीमध्ये सामान्य केळीपेक्षा काही अधिक लोह असल्याने शरीरात लोहाची कमतरता ही लाल केळी लगेच दूर करते.
लाल केळी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित करते. हे घेतल्याने पोट देखील भरलेले राहते आणि जास्त भूक लागत नाही.
लाल केळीचे सेवन केल्यास मन शांत होते. त्यात सापडलेला ट्रायटोफन मनाला शांत करतो आणि आपली बुद्धिमत्ता वाढवते.
लाल केळीच्या सेवनामुळे पोटात होणारी जळजळ देखील कमी होते. तरी प्रत्येकाने एकद याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.