Fruit Crop Fertilizers : कोरडवाहू फळपिकांना कोणती खते द्यावीत?

Team Agrowon

फळझाडांच्या लागवडीचे यश हे जमीन, हवामान, खत आणि सिंचन व्यवस्थापन या बाबींवर अवलंबून असते. यापैकी खत व्यवस्थापनास ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

Fruit Crop Fertilizers | Agrowon

फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाच्या फळ उत्पादनासाठी जमीन सुपीक ठेवणे जरूरीचे आहे.

Fruit Crop Fertilizers | Agrowon

फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांवर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. त्यामुळे जमीन सुपीकतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Fruit Crop Fertilizers | Agrowon

जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ कमी होते. फळझाडे कीड- रोगास बळी पडतात.

Fruit Crop Fertilizers | Agrowon

झाडांची वाढ निकोप होण्यासाठी योग्य मशागत, तणांचा वेळीच बंदोबस्त, खतांचा संतुलित वापर, आछादनासाठी सेंद्रीय पदार्थांचा वापर, आंतरपिके इत्यादी मार्गांनी जमिनीची सुपिकता चांगली ठेवणे फायदेशीर ठरते.

Fruit Crop Fertilizers | Agrowon

सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यांत खते द्यावीत. परंतु खतमात्रा देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत.

Fruit Crop Fertilizers | Agrowon

सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यांत संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत, संपूर्ण स्फुरद व पालाश यांची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यांत विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Fruit Crop Fertilizers | Agrowon
आणखी पाहा...