Team Agrowon
शेळीचे दूध अत्यंत गुणकारी असून, विशेषतः लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चांगले असते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
शेळीच्या दुधात रायबोफ्लोवीन (व्हिटॅमिन बी २) योग्य प्रमाणात असते. हे ॲण्टी ऑक्सिडंट असून, लाल रक्त पेशी निर्मिती, शरीरपेशींची वाढ आणि जखमा भरून येण्यासाठी होतो.
शेळीचे दूध कॅल्शिअमचा उत्तम स्रोत मानला जाते. कॅल्शिअममुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. आतड्याच्या कर्करोगापासून तसेच स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या स्तनाच्या कर्करोगापासून बचाव होतो.
शेळीच्या दुधात पोटॅशिअम योग्य प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी शेळीचे दूध गुणकारी मानले जाते.
शेळीचे दूध पचनास अत्यंत हलके असते. कारण यामध्ये फॅट ग्लोब्युल म्हणजेच स्निग्ध पदार्थांचे घनगोल (गोळे) आकाराने छोटे असतात.
शेळीच्या दुधात जीवनसत्त्व ‘अ’ मुबलक प्रमाणात असते. हे जीवनसत्त्व डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी उपयोगी असते.