Swarali Pawar
निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, फळमाशी आणि खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. हा अर्क पिकांना अनेक प्रकारच्या कीडांपासून संरक्षण देतो.
निंबोळी अर्क तयार करण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. शेतकरी तो घरच्या घरी सहज बनवू शकतात.
अर्कामुळे किडे पिकांची पानं, फुलं आणि फळं खाणं बंद करतात. त्यामुळे पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर कमी होतं.
अनेक किडी पिकांवरच अंडी घालतात, पण निंबोळी अर्क फवारल्यास त्यांना अंडी घालता येत नाही. यामुळे किडींची संख्या कमी राहते.
किडी वाढताना कात टाकतात, पण अर्कामुळे ही प्रक्रिया थांबते. परिणामी किडी योग्यरीत्या वाढू शकत नाहीत आणि मरतात. निंबोळी अर्कामुळे किड्या पूर्णपणे विकसित न होता अपूर्ण आणि अशक्त राहतात.
निंबोळी अर्काचा वास आणि चव किडींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या पिकाजवळ येत नाहीत आणि पिकं सुरक्षित राहतात.
हा अर्क नैसर्गिक असल्यामुळे प्रदूषण करत नाही. तो जमिनीत, पाण्यात किंवा हवेत काहीही हानिकारक परिणाम करत नाही.
निंबोळी अर्क किंवा पेंड वापरल्यास जमिनीतल्या अळ्या व किडी कमी होतात. त्यामुळे पिकांची मुळे अधिक मजबूत आणि निरोगी राहतात.