Swarali Pawar
या अळीला हिरवी अमेरिकन बोंडअळी व घाटे अळी म्हणतात. ती सोयाबीनसह तूर, हरभरा, मूग, उडीद, मसूर अशा अनेक पिकांवर हल्ला करते.
अंडी पिवळसर पांढरी व गोलसर असतात. पूर्ण वाढलेली अळी ३.५ ते ५ से.मी. लांब असून पाठीवर करड्या रंगाच्या उभ्या रेषा असतात.
पतंग पिवळसर रंगाचा असून पंखांवर काळे ठिपके असतात. पंख साधारण ३.७ से.मी. असतात आणि मागील पंखांच्या कडा धुरकट रंगाच्या दिसतात.
अळी पाने, कळ्या, फुले आणि शेंगा खाते. शेंगांमध्ये छिद्रे पाडून दाणे नष्ट करते. शेंगांच्या टरफलावर तपकिरी डाग पडतात.
ढगाळ वातावरणात या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे पिकाचे नियमित निरीक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शेतात तणांचे नियंत्रण करावे, बांधावरील वनस्पती नष्ट कराव्यात, पक्षी थांबे उभारावेत आणि हेक्टरला ५-१० कामगंध सापळे लावावेत.
फ्लुबेंडायअमाईड, स्पिनेटोरम यांसारख्या शिफारस केलेल्या कीडनाशकांची फवारणी करावी. सापळ्यात जमा झालेल्या पतंगांना नष्ट करणे आवश्यक आहे.
बीटी बॅक्टेरियाचा वापर करून फवारणी करावी. गरजेनुसार १०-१२ दिवसांनी दुसरी फवारणी करून अळीचे प्रमाण कमी करता येते.