Team Agrowon
वाढत्या थंडीमुळ दुधाळ जनावरांवर ताण येतो. त्यांच दुध उत्पादन कमी होतं याशिवाय जनावरं विविध आजारांना बळी पडतात. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनावरांची जास्त काळजी घेणं दुधवाढीच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचं आहे.
अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. त्यांची त्वचा खरबरीत होते. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ करणं कमी होतं.
थंडीमुळे जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळेही दूध उत्पादनात घट होते.
ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते.
दुभत्या जनावरांच्या सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही.
गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे गोठ्यात घाण वास येतो. याशिवाय दुधाळ जनावरांमध्ये कासदाह आजार होण्याची शक्यता वाढते.
दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही, त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतीवरही परिणाम होतो.