Team Agrowon
द्राक्ष उत्पादनामध्ये मण्याचा आकार हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आकार मिळविण्यासाठी संजीवकांचा वापर हा योग्य अवस्थेत व योग्य प्रमाणात होण्याची गरज असते.
बेरी पातळ करून घ्यावी आणि घडाला जीएच्या द्रावणात १/४ किंवा १/३ बुडवून घ्यावे. त्यामुळे प्रत्येक पानावर ८ बेरी राहतील.
जेव्हा घडाच्या विरुद्ध पानांची रुंदी १६ सेंमी असेल आणि बेरीची रुंदी कमी असल्यास (सुमारे १२ सेंमी) प्रति पानांची संख्या ६ पर्यंत कमी ठेवावी.
मणी लांब व गोलाकार करण्यासाठी ३-४ मि.मी. मणीच्या अवस्थेत जीए ३ (५० पीपीएम) + सीपीपीयू (२ पीपीएम) या प्रमाणात वापर करावा.
बेअरिंग शूटला १५ पेक्षा जास्त पाने ठेवू देऊ नये. जेव्हा बेअरिंग शूटमध्ये पानांचे क्षेत्र अपुरे असते आणि कोंब कमी जोमदार असतात, तेव्हा घडावर सीपीपीयूची प्रक्रिया करू नये.
बेरीचा आकार बाजरी दाण्याइतका येण्यापूर्वी वेली बांधू नयेत. बेरी पातळ करण्यासाठी उशीर करू नका.
मणी वाढीसाठी जीए आणि सीपीपीयू यांचा वापर अत्यावश्यक आहे. थॉमसन सिडलेस तसेच खाण्यासाठी वापरात येणाऱ्या रंगीत जाती मध्ये मण्यांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी संजीवकांची मात्रा प्रमाणित केलेली आहे.