Cow Heat Stroke: जनावरांमधील उष्माघाताची कारणे काय आहेत?

Swarali Pawar

जनावरांची काळजी

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जनावरांनाही उष्णतेचा त्रास होतो. योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांमध्ये उष्माघात होऊ शकतो.

Animal Care | Agrowon

उष्माघात म्हणजे?

उष्माघात म्हणजे जनावरांच्या शरीराचे तापमान जास्त वाढणे. यामुळे जनावरांची ताकद कमी होते आणि आरोग्यावर परिणाम होतो.

What is Heat Stroke | Agrowon

उष्णता शरीरात अडकते

जेव्हा शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही तेव्हा उष्माघात होतो. जास्त तापमानामुळे जनावरांवर ताण येऊ लागतो.

Heat in body | Agrowon

भर उन्हात काम

उन्हाळ्यात भर उन्हात जनावरांकडून जास्त काम करून घेतल्यास ताण वाढतो. यामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची शक्यता वाढते.

Working in High Temperature | Agrowon

पाणी न मिळाल्यास धोका

जनावरांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर शरीराचे तापमान वाढते. पुरेसे पाणी न पिल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते.

Less Water Intake | Agrowon

उपाशीपोटी काम

जनावरांना खुराक न देता काम करून घेतल्यास त्यांची सहनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत उष्णतेचा परिणाम अधिक होतो.

Hungry Cow | Agrowon

गोठ्यात गर्दी

गोठ्यात कोंदट वातावरण असल्यास जनावरांना त्रास होतो. हवा खेळती नसल्यास उष्णतेचा ताण वाढू शकतो.

More cow in one shed | Agrowon

भर उन्हात चरणे

गाई-म्हशींना भर उन्हात चरायला नेल्यास उष्णतेचा परिणाम वाढतो. उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतणेही टाळावे.

Feeding under sun | Agrowon

Solar Panel Cleaning: सौर पॅनल स्वच्छ करताना घ्या ही काळजी; छोट्या चुका ठरू शकतात धोकादायक

अधिक माहितीसाठी...