Swarali Pawar
आजकाल अनेक शेतकऱ्यांनी शेतात सौर पंप बसवले आहेत. पॅनेलवर धूळ, पाने व पक्ष्यांची विष्ठा जमा झाल्याने स्वच्छता करणे गरजेचे असते.
उन्हाळ्यात धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे पॅनल लवकर मळकट होतात. यामुळे पॅनलवर सूर्यप्रकाश कमी पडतो आणि वीज निर्मिती घटू शकते.
सोलर पॅनलमध्ये DC (डायरेक्ट करंट) वीज तयार होत असते. काळजी घेतली नाही तर साफसफाई करताना विजेचा धक्का बसू शकतो.
कडक उन्हात पॅनेल साफ करू नका आणि ओले हात- कपडे वापरू नका. लोखंडी ब्रश किंवा धारदार साधने वापरणेही टाळावे.
उघड्या वायरिंगला किंवा पॅनलच्या काचेला थेट हात लावू नका. मुलांना सोलर सिस्टिमजवळ खेळू देऊ नये.
शक्यतो स्वच्छ पाण्यानेच पॅनल साफ करावेत. धूळ जास्त चिकट असल्यास सौम्य शाम्पू वापरावा, डिटर्जंट टाळावे.
साफसफाई सकाळी किंवा संध्याकाळी करणे योग्य ठरते. रबरचे ग्लोव्हज, कोरडे कपडे आणि मऊ स्पंज वापरणे सुरक्षित असते.
सौर पॅनल साधारण तीन महिन्यांनी एकदा स्वच्छ करणे योग्य आहे. यामुळे पॅनलची कार्यक्षमता टिकून राहते आणि वीज उत्पादन चांगले होते.