Swarali Pawar
कामगंध सापळे किडींच्या नर पतंगांना आकर्षित करून पकडतात. यामुळे किडींची संख्या कमी होऊन पिकाचे नुकसान घटते.
नरसाळ्यासारखा आकार असून खाली पॉलिबॅग असते. कापूस, मका, तूर, टोमॅटो यांसारख्या पिकांतील अळीसाठी उपयुक्त आहे.
त्रिकोणी आकाराचा प्लास्टिक किंवा कार्डबोर्डचा सापळा असतो. ऊसावरील खोडकीड व वांग्यावरील शेंडा–फळ पोखरणाऱ्या अळीसाठी वापरला जातो.
प्लास्टिक थाळीत पाणी व ल्यूर ठेवून नर पतंग पकडले जातात. ऊस, कोबी, फ्लॉवर, वांगी यामधील किडींसाठी प्रभावी आहे.
‘T’ अक्षरासारखा सापळा असून खाली कीटक साठवण्याचे भांडे असते. आंबा, डाळिंब, भेंडी, टोमॅटो, काकडी यांसारख्या पिकांमध्ये वापर होतो.
१–२ लिटर प्लास्टिक बाटलीपासून तयार केलेला सापळा आहे. कमी खर्चात फळमाशी व इतर किडींच्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे.
बादलीसारखा सापळा असून आत पडलेले कीटक बाहेर येत नाहीत. नारळावरील गेंड्या भुंगा व लाल सोंडया भुंग्यासाठी उपयुक्त आहे.
पीक आणि किडीच्या प्रकारानुसार योग्य कामगंध सापळा निवडावा. यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी होऊन पिकाचे संरक्षण होते.