Swarali Pawar
कांद्याला पाटाने, ठिबक आणि तुषार अशा पद्धतीने पाणी दिले जाते. ठिबक व तुषार या दोन्ही पद्धतींना सूक्ष्म सिंचन म्हणतात.
सूक्ष्म सिंचनात पाणी थेट मुळांजवळ थेंबाथेंबाने दिले जाते. यामुळे पिकाला गरजेइतकेच पाणी मिळते.
मुळांजवळ कायम वाफसा राहिल्याने पिकाची वाढ संतुलित होते. अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होऊन उत्पादन वाढते.
सूक्ष्म सिंचनामुळे ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. ठिबकद्वारे खत दिल्यास सुमारे २५ टक्के खतांची बचत होते.
अति आर्द्रतेमुळे येणारे करपा व कुज रोग कमी होतात. तुषार सिंचनामुळे दव, धुके व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव घटतो.
पाणी फक्त मुळांजवळ दिल्याने तण कमी उगवते. निंदणी व औषध फवारणीचा खर्चही कमी होतो.
या पद्धतीचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो. यंत्रणेची योग्य देखभाल न केल्यास नळ्या चोक होऊ शकतात.
पाटपाणीत पाण्याचा अपव्यय व मजुरी खर्च जास्त होतो. सूक्ष्म सिंचनामुळे खर्च कमी होऊन उत्पादन व नफा वाढतो.