Aslam Abdul Shanedivan
नारळ आपल्या परिचयाचे असून शहाळ्याचे पाणी अनेकांनी पिले असेलच. निसर्ग उपचार तज्ज्ञ डॉ. प्रमोद ढेरे यांनी याच्या वापराबद्दलही काही माहिती दिली आहे. ती पुढील प्रमाणे
नारळ बहूगुणी असून ते औषधी गुणांनीपूर्ण आहे. यात कार्बोहाइड्रेट, फायबर्स, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटक असतात.
अपचन, छातीत जळजळ असे त्रास असणार्यांनी नारळाचे सेवन करावे, आपल्याला आराम मिळेल
अनियमित मासिक धर्माचा त्रास असणार्या महिलांनी रोज १० ग्रॅम ओले खोबरे खाऊन गायीच्या दुधाचे सेवन केल्यास मासिक धर्मातील सर्व समस्या सुटतात.
नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्याचे काम करतात. तर अल्सरसारख्या आजारासह किडनी, थायरॉइड, डायबिटीज, मुत्राशयाचे विकारांवर देखील उपयुक्त आहे.
नारळाचे दूध, एक चमचा खसखस आणि एक चमचा मधाचे मिश्रण खोकल्यावर रामबाण उपाय आहे.
नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते. त्याचबरोबर खोबरेल तेल आंबट दही, मुलतानी माती यांचे मिश्रण लावल्यास केसही चमकदार होतात.