Swarali Pawar
चुकीच्या पद्धतीने बनवलेला मुरघास पचनसंस्थेला हानी पोहोचवतो. यामुळे अपचन, पोटफुगी व अतिसाराचे प्रमाण वाढते.
अचानक किंवा जास्त प्रमाणात मुरघास दिल्यास अपचन होते. आहारात कडबा व तंतुमय चाऱ्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादन घटते. रवंथ प्रक्रिया बंद होणे हे अपचनाचे प्रमुख लक्षण आहे.
पोटफुगी होऊन पोट गच्च व वेदनादायक होते. जनावरे पोटावर लाथ मारताना दिसतात.
दुर्गंधीयुक्त जुलाब होतात व शेणात न पचलेले कण दिसतात. काही वेळा कमी प्रमाणात कोरडे शेण येते.
शरीरातील पाणी कमी झाल्याने नाक कोरडे दिसते. डोळे खोलगट होतात आणि त्वचा कोरडी पडते.
चुकीच्या आंबवणीतून लिस्टिरिओसिससारखा आजार होऊ शकतो. जनावर एका बाजूला सतत गोल फिरताना दिसते.
योग्य पद्धतीने बनवलेला मुरघास पोषण देणारा ठरतो. चांगला मुरघास जनावरांचे आरोग्य व उत्पादन टिकवतो.