Swarali Pawar
गोठा रोज स्वच्छ व कोरडा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी साचू नये यासाठी योग्य उतार आणि हवा खेळती ठेवा.
दूध काढण्यासाठी स्वच्छ व मोकळी जागा वापरावी. शक्यतो दूध काढण्याची जागा गोठ्यापासून वेगळी ठेवावी.
दुभत्या जनावरांची कास, शेपूट व मागील मांड्या स्वच्छ पुसाव्यात. यामुळे जनावर तरतरीत राहते आणि दूध उतरायला मदत होते.
कोमट पाण्यात पोटॅशियम परमँगनेट टाकून कास धुवावी. धुतल्यानंतर कास कोरड्या टॉवेलने नीट पुसावी.
दूध काढणाऱ्याने हात स्वच्छ धुवून मगच दूध काढावे. स्वच्छ, निर्जंतुक भांडी व गाळणी तयार ठेवावी.
प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा वेगळ्या कपात काढाव्यात. पूर्ण मुठ पद्धतीने ७–८ मिनिटांत दूध काढावे.
डोम आकाराच्या भांड्यात दूध काढून लगेच स्वच्छ खोलीत ठेवावे. दूध काढताना जनावराला वास येणारी वैरण देऊ नये.
दूध मलमलच्या कापडाने गाळून स्टीलच्या भांड्यात साठवावे. थंड पाण्यात ठेवून दूध लवकर विक्री किंवा वापरात आणावे.