Roshan Talape
टॅटू म्हणजे त्वचेखाली शाई टाकून केलेली रचना आहे. यामुळे त्वचेवर काही परिणाम होऊ शकतात.
टॅटू काढल्यामुळे त्वचा कधी कधी खरखरीत व कोरडी वाटते. त्वचेचा पोत बदलतो.
टॅटू काढल्यानंतर त्वचा पूर्ववत होण्यासाठी काही आठवडे लागतात. या काळात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
स्वच्छतेची नीट काळजी न घेतल्यास संसर्ग होऊ शकतो, म्हणून टॅटू स्टुडिओ आणि तेथील वस्तू स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहे.
टॅटू काढताना त्वचेवर सूज येऊ शकते. त्वचा लालसर आणि जळजळीत होऊ शकते.
जर शाई खूप खोल टाकली असेल तर टॅटू काढताना त्वचेत कायमचा डाग राहू शकतो. यामुळे सौंदर्य कमी होऊ शकते.
टॅटू बनवताने त्यातील लाल आणि पिवळ्या रंगांमुळे अॅलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते.
टॅटू काढण्याआधी आणि नंतर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले असते. त्यामुळे त्वचेला होणाऱ्या त्रासापासून वाचता येते.