Roshan Talape
दुपारी जेवण झाल्यानंतर लगेच झोप घेतल्यास शरीरावर विविध प्रकारे विपरीत परिणाम होऊ शकतो.
झोपेत असताना शरीराची ऊर्जा खर्च होत नाही, त्यामुळे चरबी साठते आणि वजन वाढते.
पचनक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रक्तप्रवाहावर झोपेमुळे ताण येतो, ज्यामुळे हृदयावर दडपण येऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.
जेवण करुन झोपल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि थकवा वाढतो.
लगेच झोपल्याने पचन नीट होत नाही, त्यामुळे अपचन, अॅसिडिटी, जळजळ तसेच अन्न वर येण्याची शक्यता वाढते.
जेवणानंतर झोपल्यास अन्न पोटातून वर येण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि GERD सारखे त्रास होऊ शकतात.
याशिवाय, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊन मधुमेहाचा धोका वाढतो आणि दिवसभर थकवा जाणवतो.
त्यामुळे जेवणानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, हलक्या हालचाली करणे आणि योग्य वेळी पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.