Swarali Pawar
कीड लागलेली जुनी पोती वापरल्यास त्यातील अंडी किंवा किडे नवीन बियाण्यात प्रवेश करून संपूर्ण साठ्यावर उपद्रव करतात.
जुन्या किंवा किड लागलेल्या बियाण्याच्या जवळ नवीन बियाणे ठेवल्यास कीड त्यात जलद पसरते आणि नुकसान वाढते.
भिंतीतील छिद्रे किंवा कपारींमध्ये जुनी कीड लपून बसलेली असते. सफाई न करता बियाणे ठेवल्यास कीड पुन्हा साठ्यात शिरते.
धान्य किंवा खाद्य वाहून नेणाऱ्या साधनांमुळेही कीड एका जागेतून दुसऱ्या जागेत पोहोचते व साठवणुकीत प्रवेश करते.
काही कीडी जसे सोंड किडा, कडधान्यातील भुंगेरा, धान्यातील भुंगेरा आणि पतंग पीक पक्व होत असताना दाण्यावर अंडी घालतात.
अंडी असलेले दाणे मळणीनंतर थेट साठवणुकीत गेले की अंडी फुटून कीड संपूर्ण साठ्यात जलद पसरते.
ओलावा आणि गरम वातावरण किडींची वाढ झपाट्याने वाढवते. त्यामुळे बियाण्यातील ओलावा जास्त असेल तर उपद्रव तीव्र होतो.
साठवणुकीपूर्वी सफाई करणे, कोठी हवाबंद ठेवणे, बियाणे चांगले वाळवणे, आणि योग्य उपचार करणे आवश्यक. यामुळे बियाणे सुरक्षित राहते आणि नुकसान टळते.