Fish Preservation : या पद्धतीने जास्त दिवस टिकतील मासे

Team Agrowon

माशांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, मासे लवकर खराब होतात. मासळीला लवकर बर्फामध्ये ठेवली नाही तर ती खाण्यालायक राहत नाही.

Fish Preservation | Agrowon

बर्फात मासळी ३ ते ५ दिवस ताजी राहू शकते. मासळीला जास्त दिवस जास्त दिवस खाण्यालायक ठेवायची असेल तर तिच्यावर प्रक्रिया केली पाहिजे.

Fish Preservation | Agrowon

मासे गोठविणे - मासे एकत्रित किंवा वेगवेगळे करून गोठविता येतात. शीत यंत्राने माशांचे  तापमान शून्यापेक्षा फार कमी म्हणजे -२०° ते ४०°C ला आणून गोठविले जाते.

Fish Preservation | Agrowon

मासे सुकविणे समुद्रकिनारी उन्हामध्ये मासे सुकविण्याची पद्धत फार जुनी आहे. पण असे सुकविलेले मासे वाळूने दूषित होत असतात.

Fish Preservation | Agrowon

खारवणे - मिठात किंवा मिठाच्या द्रावणात बुडवून माशांमधील पाण्याचे प्रमाण २० ते २४ टक्के कमी करता येते. मिठामुळे माशांची जंतूंमुळे खराब होण्याची क्रिया रोखली जाते. ती सर्वसाधारण तापमानातही काही दिवस चांगली राहतात.

Fish Preservation | Agrowon

मासे हवाबंद डब्यात ठेवणे- मासे तेलात किंवा मिठाच्या द्रावणात हवाबंद करुन नंतर ते डबे निर्जंतुक केले असता जवळ जवळ वर्षभर टिकतात व आपल्याला हवे तेव्हा खाता येतात.

Fish Preservation | Agrowon

निर्जंतुकीकरणामुळे जंतू नष्ट होतात. हवाबंद डब्यातले मासे परदेशात फार प्रचलित आहेत.

Fish Preservation | Agrowon