Mahesh Gaikwad
झाडावर लगडलेल्या चिंचा पाहिल्या की, कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंचेचं नुसतं नाव काढताच तोंडाला पाणी सुटते.
चिंचेपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. चटणी, लोणचे, केचअप, सॉस, आइस्क्रीम, सरबत आणि लोणच्यात चिंचेचा लगदा महत्त्वाचा घटक असतो.
चिंचेचा वापर आयुर्वेद आणि औषधी प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. शरीर थंड ठेवणारा घटक म्हणून चिंचेला मागणी असते.
कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यासाठी चिंच पाणी वापरतात.
याशिवाय अनेक खाद्यपदार्थांमध्ये चिंचेचा वापर करण्यात येतो. चिंचेची पावडर गोळ्या, बिस्किटे व चॉकलेटमध्ये वापरतात.
चिंचेप्रमाणेच चिंचोका देखील बहुगुणी आहे. काही आदिवासी चिंचोक्याच्या पिठाची भाकरी करून खातात. तसेच पिठाची खळ बनवितात.
चिंच फळापासून उत्तम चटणी, सॉस व सरबत बनवतात. युरोप, अमेरिकेत चिंचेतील आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात.