Mahesh Gaikwad
बऱ्याचदा कामाच्या दगदगीत आपण दुपारचे जेवण करणे विसरतो किंवा टाळतो. पण वारंवार असे केल्याने याचे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही वारंवार दुपारचे जेवण करणे चुकवत असाल, तर यामुळे चक्कर येणे, जोरात भूक लागणे, थकवा आणि अचानक मूज बदलणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अन्नामुळे आपल्या मेंदूला पोषण तत्त्व मिळतात, ज्यामुळे मेंदूचे कार्य चांगले राहते. अशावेळी जर तुम्ही दुपारचे जेवण नाही केले, तर तुम्हाला समस्या होऊ शकतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील साखरेची पातळी गरजेपेक्षा कमी होऊ नये म्हणून शरीराची अन्नाची गरज पूर्ण करणे आवश्यक आहे.
तुम्ही जर सतत दुपारचे जेवण करत नसाल, तर तुम्हाला हायपोग्लासेमिया आजार होऊ शकतो. या आजारात शरीरातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते.
मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी तर दुपारचे जेवण चुकूनही चूकवू नये. कारण असे केल्यास अशा रुग्णांची प्रकृती बिघडू शकते.
दुपारचे जेवण टाळण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपल्याला अधिकच भूक लागते. यामुळे आपण प्रमाणापेक्षा अधिक जेवण करतो. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते.
दुपारचे जेवण सकाळी ११ ते १ या कालावधित करावे. यामुळे तुम्ही दिर्घकाळ निरोगी राहाल. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.