Mahesh Gaikwad
जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतातही लाखो लोक मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
मधुमेहाच्या रूग्णांना साखर निंयत्रणात ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाचे रूग्ण विविध प्रकारचे उपचार घेतात. पण तुमच्या स्वयंपाक घरात असणारी एक जिन्नस यावर प्रभावी उपचार ठरू शकते.
मेथी दाणे किंवा मेथ्या हे आपल्याला स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारी जिन्नस आहे. याचे आयुर्वेदातही अनेक फायदे सांगितले आहेत.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याबरोबरच मेथीचे दाणे आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत.
एका पातेल्यात एक कप पाणी घ्या. यामध्ये एक चमचा मेथी दाणे टाका. हे पाणी चांगले उकळून घ्या.
उकळलेले पाणी थंड करून घ्या. दररोद सकाळी मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास मगदत होईल. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.