Strawberry Benefit: स्ट्रॉबेरीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत?

कृष्णा काळे

 जीवनसत्त्वे : जीवनसत्व क चांगल्या प्रकारे उपलब्ध होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात जीवनसत्त्व अ, क आणि विविध प्रकारची ब जीवनसत्त्वेदेखील असतात.

Strawberry | Agrowon

अँटिऑक्सिडंट्स : स्ट्रॉबेरी अँथोसायनिन्स आणि इलाजिक ॲसिडसारख्या अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहेत. हे घटक पेशींचे संरक्षण करत असल्यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी करतात.

Strawberry | Agrowon

हृदयाचे आरोग्य : स्ट्रॉबेरीमध्ये उच्च अँथोसायनिन घटक असल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करतात. त्याचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी होतो.

Strawberry | Agrowon

तंतुमय पदार्थ : तंतूमय पदार्थांचा चांगला स्रोत असून, पचनास मदत करतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.

Strawberry Market | Agrowon

दाह विरोधी : स्ट्रॉबेरीमधील अँटिऑक्सिडंट्समध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. जळजळ, दाह यांचा धोका कमी होतो.

Strawberry

त्वचेचे आरोग्य : स्ट्रॉबेरीमधील जीवनसत्व क हे निरोगी त्वचेसाठी आवश्यक अशा कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.

Strawberry
क्लिक करा