Vegetable Export : काय आहेत भाजीपाला निर्यातीचे मापदंड?

Team Agrowon

भाजीपाला उत्पादनाचे नियोजन

भाजीपाला निर्यातीसाठी देशनिहाय वेगवेगळे मापदंड आहेत. त्यानुसार सर्व निकषांचे पालन करून उत्पादनाचे नियोजन करावे लागते.

Vegetable Export | Agrowon

भेंडी

फळे नाजूक व रंग हिरवा, कोवळी लुसलुशीत ६ ते ७ सें.मी. लांब, साठवणीस योग्य, एकसारख्या आकाराची, डागविरहित, कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी.

Vegetable Export | Agrowon

मिरची

गर्द हिरव्या रंगाची, तिखट, साठवणीस योग्य, फळाचा आकार एकसारखा असावा. मिरची ६ ते ७ सें.मी. लांब असावी.

Vegetable Export | Agrowon

कारले

रंग हिरवा, २५ ते ३० सें.मी. लांबीची असावी. मान बारीक असावी. हिरवी काटेरी असल्यास अधिक चांगले.

Vegetable Export | Agrowon

गवार

हिरव्या रंगाची ७ ते १० सें.मी. लांब असावी आणि कोवळी लुसलुशीत असावी. बी धरलेली असू नये.

Vegetable Export | Agrowon

दुधी भोपळा

२५ ते ३० सें.मी. लांबीचा, दंड गोलाकार, ड्रमच्या आकाराचा आणि फिकट हिरव्या रंगाचा असावा.

Vegetable Export | Agrowon

टोमॅटो

गोल, मध्यम आकाराचे अगर अंडाकृती असावे. रंगाने लालसर, पूर्ण पिकण्याच्या अगोदरची अवस्था, तसेच वरची साल सुरकुतलेली नसावी तर तजेलदार आकर्षक असावी. टोमॅटोचे फळ डागविरहित असावे.

Vegetable Export | Agrowon

कांदा

मोठा आणि लहान अशा दोन्ही आकारांच्या कांद्याची निर्यात करता येते. मोठ्या कांद्याचा आकार ४ ते ६ सें.मी. असावा. गडद ते फिकट लाल रंग, गोलाकार, तिखट. अगदी लहान कांद्यास म्हणजे २ ते ३ सें.मी. आकार. लाल रंगाच्या गोलाकार कांद्यास खूप देशांतून मागणी आहे.

Vegetable Export | Agrowon

बटाटा

४.५ ते ६.० सें.मी. आकाराचा पांढरट अंडाकृती असावा. वरची साल आकर्षक असावी.

Vegetable Export | Agrowon

शेवगा

शेंगा ५० ते ६० सें.मी. लांबीच्या व गरयुक्त असाव्यात तसेच एकसारख्या जाडीच्या आणि लांबीच्या असाव्यात.

Vegetable Export | Agrowon
आणखी पाहा