Orchard Plantation : फळबाग लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?

Team Agrowon

फळबाग लागवडीपूर्वी

फळबाग लागवडीपूर्वी जमिनीचा प्रकार, फळझाडांची निवड, बारमाही पाणी व्यवस्था, स्थानिक हवामान, माती, पाणी परिक्षण, कलमांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार अवश्‍य करावा.

Orchard Plantation | Agrowon

जागेची निवड

उत्तम निचरा, मध्यम खोलीची जमीन फळबाग लागवडीसाठी निवडावी.

Orchard Plantation | Agrowon

हवामान

फळबागेसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान आवश्यक असते. चिकू, आंबा, केळी या फळपिकांना तुलनेने जास्त उष्ण हवामान मानवते.

Orchard Plantation | Agrowon

जमीन

लागवडीपूर्वी माती परिक्षण अवश्य करावे. फळझाडांची कलमे अनेक प्रकारच्या जमिनीत येऊ शकतात. तथापि, मध्यम प्रतीची, पोयटायुक्त, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते.

Orchard Plantation | Agrowon

पूर्वमशागत

निवडलेल्या जमिनीची उन्हाळी खोल नांगरट करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. त्यानंतर जमीन समपातळीत आणून योग्य अंतरावर खड्डे खोदण्यासाठी बागेची आखणी करावी.

Orchard Plantation | Agrowon

लागवड पद्धती

फळबाग लागवडीसाठी चौरस, आयताकृती पद्धत तर डोंगर उतारासाठी कंटूर पद्धत वापरली जाते. घन लागवडीमध्ये जोड ओळ पद्धत तसेच ताटी पद्धतीचा फळपिकांनुसार अवलंब केला जातो.

Orchard Plantation | Agrowon

लागवडीची वेळ

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करावी. तर पाऊसमान जास्त असलेल्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यावर किंवा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड करावी.

Orchard Plantation | Agrowon

Seed Ball : बीजगोळ्यांमुळे होईल पर्यावरण संवर्धन