Swarali Pawar
टोमॅटो झाडे अचानक वाळतात, पाने पिवळी पडतात आणि मुळे कुजलेली दिसतात. रोपे मरगळलेली आणि माना पडलेली दिसतात.
लागवडीसाठी प्रतिकारक्षम जाती वापराव्यात. फेरपालट करावी आणि शेतात पाण्याचा योग्य निचरा ठेवावा.
आळवणीसाठी ट्रायकोडर्मा २० ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून वापरावे. कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानांवर आणि फळांवर पिवळसर ते काळे डाग दिसतात. पाने जळल्यासारखी होतात, फळे कुजतात व पिकाची वाढ खुंटते.
रोगग्रस्त पाने व फळे काढून नष्ट करावीत. झाडांना पाण्याचा ताण बसू नये आणि संतुलित खतांचा पुरवठा करावा.
ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. हे पर्यावरणास सुरक्षित व प्रभावी आहे.
कॅप्टन, मॅन्कोझेब, कॉपर ऑक्सिक्लोराईड, अॅझॉक्सिस्ट्रॉबीन + डायफेनोकोनॅझोल या शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
मर आणि करपा या रोगांवर एकात्मिक पद्धतीने नियंत्रण केल्यास टोमॅटो पिकाचे संरक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व नफा मिळतो.