Swarali Pawar
फुलोऱ्यात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावर हळूवार हात फिरवावा. यामुळे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरणे वाढते.
फुल उमलण्याच्या अवस्थेत आणि त्यानंतर ८ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे दाण्याचे वजन आणि भर चांगला होतो.
परागीभवनासाठी प्रति हेक्टर ४ ते ५ मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात. मधमाश्यांमुळे नैसर्गिक परागीभवन वाढते आणि उत्पादन सुधारते.
सुर्यफूलाची मुळे जमिनीत खोल जातात. दरवर्षी त्याच जमिनीत हे पीक घेऊ नये. पिकाची फेरपालट केल्यास जमिनीचा पोत व सुपीकता टिकून राहते.
तीन वर्षांपर्यंत त्याच जमिनीत सुर्यफूल घेऊ नये. वारंवार लागवड केल्यास रोग, किडीचा प्रादुर्भाव आणि उत्पादन क्षमता कमी होते.
सुर्यफूलानंतर कडधान्य किंवा तृणधान्य पिके घ्यावीत. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि रोग-किडीचे प्रमाण कमी होते.
पीक फुलोऱ्यात असताना किटकनाशकाची फवारणी करू नये. यामुळे मधमाश्या मरतात व परागीभवन थांबते.
फवारणी करणे अगदीच आवश्यक असल्यास सकाळ-संध्याकाळ मधमाश्यांचा उडण्याचा काळ टाळूनच फवारणी करावी. यामुळे पिकाचे उत्पादन सुरक्षित राहते.