Cotton Fardad : फरदड कपाशी घेण्याचे तोटे काय आहेत?

Team Agrowon

नुकसानच जास्त

कापसाचे वाढीव उत्पादन मिळविण्यासाठी बरेचसे शेतकरी दरवर्षी कपाशीची फरदड घेतात. पण फरदड घेण्याचे फायद्यांपेक्षा जास्त नुकसानच जास्त आहे.

Cotton Fardad | Agrowon

फरदड कापूस म्हणजे काय?

कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी देऊन पुन्हा कापूस पीक घेण्याच्या पद्धतीला फरदड कापूस म्हणतात.

Cotton Fardad | Agrowon

कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यापर्यंत राहते

फरदड पिकांमध्ये चांगल्या उत्पादनासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतर राहते.  

Cotton Fardad | Agrowon

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

या पध्दतीमुळे शेतात जास्त काळ कापूस पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं.

Cotton Fardad | Agrowon

खर्च वाढतो

कपाशी वेचणीनंतर रब्बी नंतरच्या हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा गोष्टींवरील खर्च वाढतो.

Cotton Fardad | Agrowon

वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं

गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेतला तर तिचं चांगल नियंत्रण करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये.

Cotton Fardad | Agrowon

हंगाम संपल्यानंतर

कपाशीची फरदड न घेता वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात.

Cotton Fardad | Agrowon
Sangamneri Goat | Agrowon
आणखी पाहा...