Roshan Talape
उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले नारळपाणी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक पेय आहे.
उन्हाळ्यात काकडीचे सेवन शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. ती शरीरातील उष्णता कमी करून शरीर हायड्रेट ठेवते.
फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेला पेरू उन्हाळ्यात पचनशक्ती सुधारतो आणि शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात लिंबू पाणी हे नैसर्गिक ऊर्जा वाढवणारे आणि शरीराला थंडावा देणारे ताजेतवाने पेय आहे.
९२% पाण्याने भरलेलं कलिंगड हायड्रेशनसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देण्यास मदत करते.
अननस पचन सुधारण्यास मदत करतो आणि शरीराला थंडावा देते.
उन्हाळ्यात द्राक्षे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि उर्जा वाढवण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले संत्रे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर ताजे आणि थंड राहण्यास मदत होते.