Organic Carbon : जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यास कोणते फायदे होतात?

Team Agrowon

सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीव वाढीस प्रोत्साहन देते, कारण जमिनीतील सूक्ष्मजीव कर्बावर आपली उपजीविका करत असतात.

Organic Carbon | Agrowon

सेंद्रिय कर्ब जमिनीतील अन्नद्रव्ये, पालापाचोळा, मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मिळते. याच बरोबर विघटनामधून सूक्ष्मजीव वनस्पतीसाठी आवश्यक मूलद्रव्येदेखील जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात.

Organic Carbon | Agrowon

जमिनीची संरचना सुधारल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. यामुळे झाडांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

Organic Carbon | Agrowon

ह्युमसचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी वाढते. या पोकळीमुळे मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करते.

Organic Carbon | Agrowon

पाणी निचरा होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.

Organic Carbon | Agrowon

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीमध्ये दिलेल्या रासायनिक खतांची उपलब्धता वाढून त्यांचा ऱ्हास कमी होतो.

Organic Carbon | Agrowon

सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे जमिनीतील खनिजद्रव्यांचे स्थिरीकरण वाढते. जमिनीतील अन्नद्रव्यांची धारणक्षमता वाढून त्यांना एकत्रित बांधून ठेवते.

Organic Carbon | Agrowon