Team Agrowon
चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा व पशुखाद्य देणे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हायड्रोपोनिक्स चारा चांगला पर्याय आहे.
पारंपरिक चारा उत्पादनासाठी ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु या तंत्रज्ञानाने ७ ते ८ दिवसांत चारा तयार होतो.
हायड्रोपोनिक्स पद्धतीने १ किलो चाऱ्यासाठी २ ते ३ लिटर पाणी लागते. तर पारंपारिक पद्धतीने ६० ते ८० लिटर पाणी लागते.
कमी तंतुमय पदार्थ आणि अधिक पिष्टमय पदार्थ यामुळे पारंपरिक मका चाऱ्यापेक्षा हायड्रोपोनिक्स चारा अधिक रुचकर लुसलुशीत, पौष्टिक, चवदार व पचनीय असतो.
चारा बनविण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा वापर नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक चारा तयार होतो.
चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा देणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
हायड्रोपोनिक्स उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हिरवा चारा उत्पादनासाठी चांगला पर्याय आहे.