sandeep Shirguppe
आहारतज्ज्ञांच्या मते, सफरचंद सकाळी आणि दुपारी खावे यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
सफरचंद रात्री ऐवजी सकाळी आणि दुपारी खाल्ल्यास फायदे मिळतील.
सफरचंदांमध्ये एक प्रकारचे विरघळणारे फायबर असते जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखत असते.
जर तुम्ही सकाळी सफरचंद खाल्ले तर त्यात असलेले फायबर तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
सफरचंदाच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
सफरचंदांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
व्हिटॅमिन-सी किंवा इतर अनेक रोगांपासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करतात.
मधुमेहासाठी सफरचंद हे एक अनुकूल फळ आहे. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.