Radhika Mhetre
ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून टाकतात, सर्व सरीच्या बगला फोडून रासायनिक खताची मात्रा देऊन पाणी दिल जात. पाणी आणि खते गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरले तर तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होते.
उसाचे पाचट न जाळता ते एक आड एक सरीमध्ये पसराव. किंवा सर्व सरीत पाचट दाबून बसवावे.
हे पाचट शेतात आच्छादनाच काम तर करतच. याशिवाय पाचट कालांतराने कुजल्यानंतर त्यापासून पिकाला चांगल सेंद्रिय खत देखील मीळत.
पाचटाच्या आच्छादनामुळे जागेवर तण उगवत नाही. उसाला जी खते दिली जातात त्या खतांचा अपव्यय होत नाही.
तण व्यवस्थापनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते. पाचट एक आड एक सरी किंवा सर्व सरीत ठेवल्यानंतर सर्व सरीत पाणी देण्यासाठी एक आड एक सरीस पाणी द्यावे लागते. पण एक आड एक सरीमध्ये पाचट पसरल्यामुळे पाण्याच बाष्पीभवन कमी होत.
पाचट ठेवलेल्या सरीतील माती पाणी शोषत असल्याने पाणी दिल्यावरही लवकर वाफसा येतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी आणि हवेच योग्य संतुलन राहून उसाच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
उसतोड झाल्यानंतर बरेच शेतकरी शेतात शील्लक राहिलेल पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे प्रदुषण तर होतच शिवाय जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजिवाणू देखील नष्ट होतात.