sandeep Shirguppe
हिंग हा भारतीय पदार्थांमधील एक महत्त्वाचा मसाल्याचा घटक मानला जातो, हिंग आरोग्यासाठीही खुप फायदेशीर आहे.
हिंगाचा आयुर्वेदीक औषधांमध्येही वापर केला जातो. जेवणात हिंगाचा चिमुभरच वापर आपल्या आरोग्याला फायदे मिळतात.
जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर सकाळी हिंगाचे पाणी प्या. यामुळे तुमचे वजन कमी होईल.
रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणासह रक्त पातळ होण्यास मदत मिळते.
हिंगामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने दमा, ब्राँकायटीस यांसारख्या श्वसनाशी निगडित तक्रारींवर हिंग उपयुक्त ठरतो.
हिंग, आलं आणि मध यांची गोळीचे सेवन केल्याने कफ कमी होण्यास मदत होते.
एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर हिंग टाकून नियमित ते पाणी प्यायल्याने पोटालाही खूप फायदा होतो.
मासिक पाळीत स्त्रियांना होणारी पोटदुखी, मळमळ यांसारख्या त्रासावर हिंग अतिशय फायदेशीर ठरतो.