Zero Tillage : शून्य मशागत शेतीचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

लागवड खर्चात बचत

लागवड खर्चात बचत करून जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान उपयुक्त आहे.

Zero Tillage | Agrowon

सेंद्रिय पदार्थांची साठवण

मातीच्या सुपीक थरांमध्ये फारशी उलथापालथ होत नाही. सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत होते.

Zero Tillage | Agrowon

सेंद्रिय कर्बाची उपलब्धता

सातत्याने सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

Zero Tillage | Agrowon

रासायनिक खताची बचत

पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलद गतीने वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते.

Zero Tillage | Agrowon

जैविक विविधतेत वाढ

विपुल प्रमाणात जमिनीमध्ये गांडूळांचा संचार सुरु होतो. जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते.

Zero Tillage | Agrowon

मातीचे तापमान

मातीचे तापमान नियंत्रित राहते. मातीच्या कणांची रचना सुधारते. मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ यात बचत होते.

Zero Tillage | Agrowon

जमिनीची धूप कमी होते

जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी वायू आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते.

Zero Tillage | Agrowon

ओलावा टिकून राहतो

बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो. पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.

Zero Tillage | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...