Mahesh Gaikwad
हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि पावसाची अनियमितता यामुळे शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर भविष्यातील शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि पशु प्रदर्शन बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात भरविण्यात आले आहे.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत बारामतीमध्ये कृषिक २०२४ कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
कर्नाटक राज्याचे कृषीमंत्री चेलुवरय्यास्वामी यांच्याहस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारही उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे लाईव्ह डेमो प्लॉट पाहता येणार आहेत.
पिकांवरील खते आणि किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत.
भविष्यातील शेती ही तंत्राज्ञानावर आधारित असणार आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित फार्म व्हाईब्ज प्रकल्पाचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना पाहता येणार आहे.
शेतीशिवाय शेतकऱ्यांना पशु प्रदर्शनही पाहता येणार आहे. यामध्ये भीमथडी प्रजातीचे
अश्वही शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.