Anuradha Vipat
नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्यांना नवदुर्गा म्हणतात.
चला तर मग आज आपण नवरात्रीतील देवीची ९ रूपे कोणती आहेत ते पाहूयात.
शैलपुत्री पहिले रूप जे पर्वतांची कन्या आहे तर ब्रह्मचारिणी हे दुसरे रूप तपस्या आणि त्यागाचे प्रतीक आहे.
चंद्रघंटा हे तिसरे रूप शांतता आणि सौम्यतेचे प्रतीक आहे तर कूष्मांडा हे चौथे रुप आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे.
स्कंदमाता हे पाचवे रुप ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक आहे तर कात्यायनी हे सहावे रूप युद्धाचे प्रतीक आहे.
कालरात्री हे सातवे रूप अंधार आणि वाईट शक्तींचा नाश करते तर महागौरी हे आठवे रूप हे भक्तांना शांती आणि समृद्धी प्रदान करते.
सिद्धिदात्री हे नववे रूप सर्व अलौकिक शक्ती आणि इच्छा पूर्ण करते.