sandeep Shirguppe
सध्या निरोगी आरोग्यासाठी नियमित संतुलित आहार घेणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे.
कारण, वाढत्या वयाबरोबर त्वचेची रचना टिकवून ठेवण्यासाठी कोलेजन मोठी भूमिका बजावतो.
आपल्या शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी डॉक्टर लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करायला सांगतात.
बेरीज खायला सगळ्यांनाच आवडते. बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीजचा समावेश असतो.
बेरीज व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत. शिवाय, विविध प्रकारच्या बेरी आपल्या शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मोठी भूमिका बजावतात.
अनेकजण मासे चवीने खातात. प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून माशांना ओळखले जाते.
माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे विपुल प्रमाण आढळते. हे ओमेगा ३ फॅटी ॲसिड आपल्या त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.