Anuradha Vipat
वेट लॉस करण्यासाठी 'जिरे' या मसाल्याचे पाणी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा जिरे हा मसाला वजन घटवण्यासाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे.
जिरे पाणी शरीराची चयापचय क्रिया वाढवते, ज्यामुळे कॅलरीज जलद बर्न होतात.
जिरे पाणी पचनक्रिया सुधारते, गॅस आणि ब्लोटिंग सारख्या समस्यांपासून आराम देते.
सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी पिल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते.
जिरेमध्ये असलेले फायटोस्टेरॉल शरीरातील चरबी साठण्यापासून रोखतात.
जिऱ्याच्या पाण्यासोबतच धणे आणि बडीशेप यांचे पाणी देखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.