Anuradha Vipat
टूथपेस्टचा वापर केवळ दात स्वच्छ करण्यासाठीच नाही तर घरातील अनेक वस्तू चकाचक करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
काळवंडलेले चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट वापरा. थोडी टूथपेस्ट लावून ब्रशने चांदीचे दागिने हलके घासा
बाथरूममधील नळ, शॉवर हेडवर पाण्याचे डाग पडले असतील तर त्या टूथपेस्टने घासल्यास डाग निघून जातात
मोबाईल स्क्रीनवरील अगदी बारीक ओरखडे घालवण्यासाठी थोड्या प्रमाणात टूथपेस्ट वापरता येते.
पांढऱ्या रंगाच्या स्नीकर्सचे रबर सोल किंवा कॅनव्हासचे शूज स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट उत्तम काम करते.
टूथपेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात
टूथपेस्ट लावून घासल्याने काचेची भांडी चकाचक होतात.