Anuradha Vipat
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन नियंत्रणात ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे.
जर तुम्हाला उपाशी न राहता, चविष्ट आणि पौष्टिक पद्धतीने वजन कमी करायचे असेल, तर आहारात 'सूप' चा समावेश करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कोबीमध्ये कॅलरीज नगण्य असतात आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे शरीराला डिटॉक्स करण्यासही मदत करते.
दुधी भोपळा (लौकी) वजन कमी करण्यासाठी रामबाण मानला जातो. यात पाण्याचे प्रमाण ९२% असते.
टोमॅटोमुळे या सूपला छान आंबट-गोड चव येते आणि व्हिटॅमिन सी देखील मिळते.
मूग डाळ ही प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. हे सूप प्यायल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही.
विविध पालेभाज्या आणि इतर भाज्या वापरून हे सूप बनवता येते. यामध्ये तुम्ही ब्रोकोली, मटार, गाजर, फरसबी आणि पालक वापरू शकता.