Anuradha Vipat
राहत्या जागेचे व प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील. कामात उत्साह राहील आणि प्रवासातून चांगला लाभ संभवतो.
आर्थिकदृष्ट्या तुमची बाजू बळकट होईल व नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल.
अचानक धनलाभाचे मजबूत योग असून दैनंदिन कामे वेगाने मार्गी लागतील.
शारीरिक आरोग्य उत्तम राहील. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक शांतता लाभेल.
आज कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका आणि वाहने अत्यंत जपून चालवा.
मित्र-मैत्रिणींचा उत्तम सहवास लाभेल आणि महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्र वाढेल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपा.
गुरुग्रहाची विशेष कृपा लाभल्यामुळे महत्त्वाची कामे विनाअडथळा पूर्ण होतील.
आज शक्यतो लांबचे प्रवास टाळावेत कारण खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल आणि तुमचा इतरांवर चांगला प्रभाव राहील.
सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल.
बौद्धिक क्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि संततीचे प्रश्न मार्गी लागतील.