Anuradha Vipat
बाहेरचे महागडे डाएट प्लॅन्स किंवा सप्लीमेंट्स न वापरता, घरातील खाऊन तुम्ही दुप्पट वेगाने वजन कमी करू शकता.
आहारात मूग डाळ, तुरीची डाळ, चणे, पनीर किंवा अंड्याचा समावेश करा.
साखरेऐवजी गूळ वापरा आणि मैद्याच्या ऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीचा समावेश करा.
जेवणापूर्वी एक वाटी काकडी, गाजर आणि टोमॅटोचे सॅलड खा.
रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी करा.
दिवसभरातून ४-५ वेळा कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात.
घरचे जेवण पौष्टिक आणि तेल-मसाल्यांच्या बाबतीत नियंत्रणात असल्याने ते सर्वात सुरक्षित असते.