Oil Free Breakfast : तेलकट खाणे बंद करा! निरोगी आरोग्यासाठी नाश्त्यामध्ये समाविष्ट करा हे झीरो-ऑईल ऑप्शन्स

Anuradha Vipat

बिना तेलाचा नाश्ता

आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी कमीत कमी किंवा बिना तेलाचा नाश्ता करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Oil Free Breakfast | Agrowon

झटपट ऊर्जा

सकाळी तेलकट खाण्याऐवजी पौष्टिक आणि हलका नाश्ता केल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.

Oil Free Breakfast | Agrowon

भाज्या घालून वाफेवरील इडली

तांदूळ-उडीद डाळीचे किंवा झटपट रव्याचे पीठ वापरून इडली बनवता येते. यात तेल अजिबात लागत नाही, कारण ही वाफेवर शिजवली जाते.

Oil Free Breakfast | agrowon

मूग डाळ धिरडे

मूग डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असते, जे स्नायू बळकट करण्यास आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करते.

Oil Free Breakfast | agrowon

पौष्टिक मोड आलेले कढधान्य

हा नाश्ता विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरचा खजिना आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि त्वचाही उत्तम होते.

Oil Free Breakfast | Agrowon

ओट्स आणि केळीची स्मूदी

ज्यांच्याकडे सकाळी नाश्ता शिजवायला वेळ नसतो, त्यांच्यासाठी हा 'नो-कुक' उत्तम बिना तेलाचा नाश्ता आहे.

Oil Free Breakfast | Agrowon

उकडलेले स्वीट कॉर्न आणि भाज्या चाट

पिवळे मका उकडून त्यात विविध भाज्या मिक्स करून हा चाट तयार होतो. उकडलेल्या कॉर्नमध्ये चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, चाट मसाला, जिरे पावडर आणि कोथिंबीर घालून एकत्र करावे.

Oil Free Breakfast | agrowon

Oats Recipes : कमी वेळेत पौष्टिक नाश्ता! वजन कमी करण्यासाठी ओट्स स्मूदीची सोपी रेसिपी

Oats Recipes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...