Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी आणि पोट साफ ठेवण्यासाठी ओट्स हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स असतात, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही आणि वजनावर नियंत्रण राहते.
ज्यांच्याकडे सकाळी स्वयंपाक करायला वेळ नसतो, त्यांच्यासाठी हा 'नो-कुक' उत्तम ब्रेकफास्ट आहे.
३-४ मोठे चमचे ओट्स, १ पिकलेले केळे, १ ग्लास मलाई नसलेले दूध किंवा बदामाचे दूध, १ चमचा मध, २-३ बदाम.
ओट्स थोडे मऊ होण्यासाठी १० मिनिटे कोमट पाण्यात किंवा दुधात भिजत ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले ओट्स, केळीचे तुकडे, दूध आणि मध टाका.हे सर्व एकत्र करून मिक्सरला चांगले फिरवून घ्या.
एका ग्लासमध्ये काढून वरून बदामाचे काप टाका. तुमची झटपट आणि पोटभरीची ओट्स स्मूदी तयार आहे.